पुणे: भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलातील अधिकारी पदावर निवड होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात मोफत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्या वतीने या प्रशिक्षणासाठी पात्र उमेदवारांनी प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशिक्षणाचा कालावधी:
30 डिसेंबर 2024 ते 8 जानेवारी 2025 दरम्यान हा SSB कोर्स क्र. 60 राबविण्यात येणार आहे. या कालावधीत प्रशिक्षणार्थींना मोफत प्रशिक्षण, निवास आणि भोजनाची सुविधा पुरविली जाणार आहे.
प्रवेशासाठी मुलाखतीची तारीख:
27 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेल्फेअर (DSW), पुणे यांच्या वेबसाईटवर SSB-60 कोर्ससाठी अर्ज करावा आणि आवश्यक दस्तऐवजांसह मुलाखतीस हजर राहावे.
प्रवेशासाठी पात्रता:
उमेदवारांनी CDSE-UPSE किंवा NDA-UPSE परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी व SSB मुलाखतीसाठी पात्र ठरलेले असावे.
NCC ‘C’ प्रमाणपत्र (A किंवा B ग्रेड) असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स किंवा युनिव्हर्सिटी एन्ट्री स्कीम (UES) साठी SSB कॉल लेटर असणे आवश्यक.
संपर्कासाठी: प्रशिक्षण केंद्र प्रभारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी ई-मेल: training.pctcnashik@gmail.com, दूरध्वनी: 0253-2451032, किंवा व्हाट्सअॅप: 9156073306 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन अधिकारी पदावर निवड होण्यासाठी उमेदवारांनी या प्रशिक्षण वर्गात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.